रात्रीची हाकामारी खरी असते का ?.....

तुम्ही कधी रात्रीच्या अंधारात हाकामारी ऐकलीये का.... ?


 तर मध्यंतरी स्त्री नावाचा सिनेमा आलेला ,  हॉरर प्लस कॉमेडी असणार्या सिनेमाची लाईन होती  'हाकामारी' .आता हाकामारी विषयी सगळ्यांनीच ऐकलय, पण हाकामारी नक्की काय करते, आपल सावज कस पकडते याविषयी बर्याच कमी लोकांना माहीतीये, तर मित्रांनो हा आमचा ब्लॉग वाचा आणी समजुन घ्या हाकामारी काय काय करते.

              नमस्कार तुम्ही वाचताय मराठी वेब दुनिया ... तर रात्रीच्या अंधारात अचानक तुमच्या नावाने एखादी हाक ऐकु आली , कधी मोकळ्या रस्त्यावर तर कधी घराच्या दारावर तुम्हाला हाक मारुन आवाज दिला तर समजायच ती हाकामारीच आहे. ९०-८० च्या दशकात बंगळुर आणी आसपासच्या परिसरात ही अफवा तुफानावर होती. या चेटकीनीच्या प्रभावामुळे अनेक लोक गायब झाल्याची अफवा देखील त्या काळी पसरवण्यात आली होती. चेटकीनीच्या भितीने घाबरलेले लोक आपलं आणी आपल्या परिवाराच रक्षन करण्यासाठी 'नालेबा' हे वाक्य घरावर लिहित असायचे त्यामुळे ती चेटकीन त्या परिवाराला आणी घरातील सदस्यांंना कुठ्ल्याच प्रकारची ईजा करत नसत, याच अफवेने खांदेश आणी मराठवाड्यातील बर्याच गावां मध्ये भितीदायक वातावरण तयार झाल होतं. ही अशी अफवा होती जिच्याने अनेकदा रात्री  लोक घराबाहेर पडायला घाबरायचे. गाव ,पाडे रात्री दहावाजे पर्यंंत सामसुम  होत असत. फक्त रात्रभर कुत्र्यांचा, वटवाघळांचा आवाज आणी अंगावर शहारे आणणारी भिती असायची. सलग २-३ वर्ष लोकांच्या मनावर हाकामारीच्या अफवेने गारुड घालुनं ठेवल होत, अगदी नावाप्रमाणे रात्री अपरात्री घरासमोर येऊन उभे राहायचे आणी घरातील प्रमुख व्यक्तीच नाव घेऊन स्त्री च्या आवाजात हाक मारायची जर त्या पुरूषाने हाकामारीच्या त्या अफवेला ओ दिली तर मात्र त्या व्यक्तीची खैर नसायची. असं म्हणतात की हाकामारी त्या व्यक्तीला उचलुन स्मशानात घेऊन जायची आणी मग दुसर्या दिवशी संधीग्द अवस्थेत एखाद्या झाडावर उलटी लटकलेली अढळुन यायची, एकतर त्या व्यक्तीची बोबडी वळलेली असायची नाहीतर ती व्यक्ती मनोरुग्ण प्रमाणे वागायची. हाकामारीच्या त्या भुताने अबाल वृधांमध्ये भिती निर्माण केली होती. हाकामारीच्या अफवेमुळे बाबा, बुवा ,तांत्रीक मांत्रीक लोकांच चांगलच फावल होत. त्यांच्या साठी हाकामारी एक बिझनेस मॉडेल बनलं होत. लोकाना गंडे दोरे विकण्या पासुन ते लोकांच्या घरात वास्तुशांती करे पर्यंंत या सगळ्या गोष्टी हे बाबा लोक करुन द्यायचे आणी त्यातुन बक्कळ पैसा कमवायचे. बर्याच वेळा चर्चेदरम्यान लोक म्हणायचे की हाकामारीची अफवा देखिल या बाबा लोकांची च असावी कदाचीत ते खर देखील असेल कारण बर्याच अफवांचे जनक हे बाबा लोक च असतात. याच लोकामुळे बर्याच गोष्टिंना हवा मिळत असते आणी लोकांमध्ये भिती निर्माण होऊन यांच्या धंद्याला चांगले दिवस येतात .

                    हाकामारीच्या अफवेला अजुन एक मजेशीर बाब आहे, अनेक लोकांच्या मते भारतीय प्रशासनानच   मुद्दाम हुन हाकामारी  ची अफवा पसरवली होती, त्याच कारणंं  काय तर साधारणता १५-२० वर्षांपुर्वी लोकांच्या घरात शौच्यालय नवती, जनजागृती मोहिमा राबवुन सुद्धा लोक शौचालय बांधत नव्हती. अशावेळी हाकामारीच्या अफवेमुळे भितिपोटी लोक रात्री अपरात्री  रानात शौचालयाला जायला घाबरत असतं. त्यामुळे अनेक लोकांनी घरातच शौचालय बांधुन घेतली होती. आता अस असल तरी याबाबत फारसं तथ्य वाटत नाही. शिवाय प्रशासनानही यावर प्रतिक्रिया द्यायच टाळल होत. तर बर्याच वर्षांपुर्विची ही हाकामारीची कथा.... 

आज काळ पालटला आहे. अशाप्रकारच्या अफवांवर आज कोन्ही विश्वास ठेवणार नाही पण तरीदेखील एखाद्या रात्री जेव्हा भुतांच्या गप्पा निघतात त्यावेळी ही हाकामारीची कथा ऐकुन काळजाचा ठोका चुकल्या वाचुन राहत नाही....  

                        तर मित्रांनो अशी ही हाकामारीची  .......

No comments:

Post a Comment